शेतकऱ्यांनी म्हटले की, त्यांना शांततापूर्ण आंदोलन करायचे आहे. यासोबतच आपले मत त्यांना जनतेपर्यंतही पोहोचवायचे आहे. कुणाला त्रास देण्याचा त्यांचा हेतू नाही. यामुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मुलांना दूध-पाण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनात राजकीय पक्षांचाही समावेश आहे. पाटणामध्ये जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक) चे कार्यकर्त्यांनी ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास पहिलेच रेल्वे रोखण्यास सुरुवात केली. काही कार्यकर्ते रेल्वे रुळावर झोपले, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
रेल्वेने 20 हजार अतिरिक्त जवान केले तैनात
शेतकर्यांनी रेल्वे थांबवण्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे संरक्षण विशेष दलाच्या (आरपीएसएफ) 20 अतिरिक्त कंपन्या म्हणजेच 20 हजार अतिरिक्त जवान देशभरात तैनात केले आहेत. त्यापैकी बहुतेकांना पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आले आहे. रेल्वे संरक्षण दलाचे डीजी अरुण कुमार यांनी निदर्शकांनी शांततेत निदर्शने करण्याचे आवाहन केले असून ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये.
Post a Comment