0

 

अभिनेत्री मोनालिसा बागल हिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनय कौशल्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली आहे. मोनालिसा लवकरच झी टॉकीज प्रस्तुत टॉकीज ओरिजिनल गस्त या चित्रपटातून 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचनिमित्ताने मोनालिसा सोबत साधलेला हा खास संवाद -

तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांग

- सुजाता नावाच्या एका गावकरी मुलीची भूमिका या चित्रपटात मी साकारली आहे. एका गावात गस्त घातली जातेय आणि त्या गावामध्ये ही मुलगी राहत आहे. सुजाता ही खूपच चंचल आहे आणि तिला अमर नावाच्या एका मुलावर प्रेम होतं. ती त्याला चोरुन चोरुन भटते आणि त्यांचं प्रेम कसं खुलत जातं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

Post a Comment

 
Top