0

 



अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर पाणी आणि जीवसृष्टीचा तपास करण्यासाठी एका रोव्हरला पाठवले आहे. 'पर्सिव्हरन्स रोव्हर'ची यशस्वी लँडिंग ही भारतीय वेळेनुसार रात्री दोन वाजता करण्यात आली. या लँडिंगचे संपूर्ण श्रेय एका भारतीय वंशांच्या महिल्या शास्त्रज्ञाला जाते. या संपूर्ण मिशनला 203 दिवस लागले असून या सहा पायांच्या रोबोटने सात महिन्यात 47 कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करुन मंगळ गाठले. या संपूर्ण मिशनमधील सर्वात कठीण आणि धोकादायक क्षण तो होता रोव्हर मंगळावरील सर्वात अवघड जजिरो क्रेटरवर उतरण्याचा. शेवटच्या सात मिनटात रोव्हराचा वेग हा शुन्यावर आणत सुरक्षित लँडिंग करण्याची मोठी जबाबदारी भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांनी यशस्वीरित्या पेलली.

सर्वात मोठी जबाबदारी स्वातीवर होती

'दि सांयस'ने सांगितल्यानुसार, मंगळ ग्रहाजवळ पोहचणे सोपे असून सर्वात कठीण काम रोव्हरच्या लँडिंगचे होते. कारण, बहुतेक रोव्हर या स्टेजला येऊन बंद पडतात. 'पर्सिव्हरन्स रोव्हर'ने शेवटच्या 7 मिनटात 12 हजार मैल प्रति तासावरून शुन्यावर येत यशस्वीरित्या लँडिंग केली. या उंचीवर, रोव्हरच्या वेगाला शुन्यावर आणत नंतर परत त्याला लँड करणे हे काही चत्मकारापेक्षा कमी नव्हते. परंतु, डॉक्टर स्वाती मोहन आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी यशस्वीरित्यापुर्ण केली.











Post a Comment

 
Top