छायाचित्र सिरियातील अतारिबचे आहे. येथे मुले आणि तरुण खंडहर झालेल्या इमारतींमध्ये खेळाद्वारे नवी आशा निर्माण करताना दिसू लागलेत. मन आणि मेंदूतील गृहयुद्धाच्या आठवणी पुसण्याचा जणू त्यांचा प्रयत्न आहे. अतारिबचे रहिवासी ३१ वर्षीय शिक्षक अहमद यांनी क्षेपणास्त्र हल्ल्यात हानी झालेल्या इमारतींचे रूपांतर बॉक्सिंग रिंगमध्ये केले आहे. येथे दिवसभर १०० हून जास्त मुले बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतात. अहमद म्हणाले, सिरियातही एकेकाळी सौख्य होते, परंतु गृहयुद्धाने सर्व काही उद्ध्वस्त करून टाकले. देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे. शाळा-महाविद्यालये बंद झाली. देशाची निम्मी लोकसंख्या बेघर आहे.
सिरियातील प्रतिकूल परिस्थितीचा मुलांच्या मनावर परिणाम होत आहे. त्यासाठीच त्यांनी मुलांना बॉक्सिंग शिकवण्यास सुरुवात केली. यातून ते वाईट आठवणींना विसरून जाऊ शकतील. त्यासाठीही आम्ही तयारी करत आहोत, असे त्यांनी सांगितले. गृहयुद्धामुळे सिरियात गेल्या १० वर्षांत ३.८० लाखांहून जास्त लोकांनी प्राण गमावले. पैकी २२ हजार मुले व १३६१२ महिलांचा मृतांत समावेश आहे.
Post a Comment