0

 

प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' हा भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा मान मिळविणारे 'हंबीरराव मोहिते' यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेच शिवधनुष्य कोणता अभिनेता पेलणार, याचा उलगडा झाला आहे. अभिनेता गश्मीर महाजनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

गश्मीरने सोशल मीडियावर चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. ''सरसेनापती हंबिरराव या चित्रपटातील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत माझा First Look. यशवन्त कीर्तिवन्त । सामर्थ्यवंत वरदवन्त । नीतिवन्त पुण्यवंत । जाणता राजा॥,'' असे कॅप्शन त्याने दिले आहे.

Post a Comment

 
Top