अभिनेता अक्षर कोठारी टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवर 22 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ‘स्वाभिमान’ या मालिकेतून तो नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
स्वाभिमान मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना अक्षर म्हणाला, ‘दोन वर्षांनंतर मी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. स्टार प्रवाहसोबतची ही चौथी मालिका करताना अतिशय आनंद होत आहे. बंध रेशमाचे, आराधना, छोटी मालकीण आणि आता स्वाभिमान. या मालिकेतला लूकही अतिशय वेगळा आहे. छोटी मालकीण मालिकेत प्रेक्षकांनी पिळदार मिश्या असलेल्या रांडग्या श्रीधरच्या रुपात मला पाहिलं होतं. मात्र स्वाभिमान मालिकेत माझा लूक पूर्णपणे वेगळा असणार आहे. अभिनेत्री आणि आता वेशभूषाकार अशी ओळख निर्माण केलेल्या शाल्मली टोळ्येने माझा लूक डिझाईन केला आहे. '
Post a Comment