बॉलिवूड दीवा दीया मिर्झाने 15 फेब्रुवारी रोजी बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न केले. दीयाचे हे दुसरे लग्न आहे. 2014 मध्ये तिने तिचा बिझनेस पार्टनर साहिल संघासोबत लग्न केले होते. मात्र 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. दीया आणि साहिलपूर्वीही बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी ऐकमेकांमध्ये खटके उडाल्याने घटस्फोट घेतला. यापैकी काहींनी पहिला संसार मोडल्यानंतर दुसरा संसार थाटला. आणि आज ते सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. एक नजर टाकुयात या सेलिब्रिटींवर...
सैफ अली खान - करीना कपूर खान
अभिनेता सैफ अली खानने 1991 मध्ये त्याच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंहसोबत कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध लग्न केले होते. दोघांनाही सारा आणि इब्राहिम नावाची दोन मुले झाली. मात्र, लग्नाच्या 13 वर्षानंतर 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अमृताने पुन्हा लग्न केले नाही पण सैफने दुसऱ्यांदा करीना कपूरसोबत लग्नगाठ बांधली. दोघांचा एक चार वर्षांचा मुलगा असून लवकरच करीना दुस-यांदा आई होणार आहे.
Post a Comment