ब्लॅक फ्राइडे' (2004), 'सरकार राज' (2008), 'गुलाल' (2009), 'ABCD'(2013) आणि 'द गाजी अटॅक' (2017) यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे के. के. मेनन. अलीकडेच त्याला सिनेसृष्टीतील मानाचा समजल्या जाणा-या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात अष्टपैलू अभिनेत्याचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. के. के. मेननने सोशल मीडियावर पुरस्काराचे फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांचेही आभार मानले. दरवर्षी सिनेसृष्टीत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
Post a Comment