0

 


छोट्या पडद्यावर 22 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ‘स्वाभिमान’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतून अभिनेत्री आसावरी जोशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अदिती सूर्यवंशी असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून त्या प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना आसावरी जोशी म्हणाल्या, ‘खूप वर्षांनंतर मी मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. हिंदीमध्ये काम करत असल्यामुळे मराठी इण्डस्ट्रीचा संपर्क काहीसा तुटला होता. मात्र स्टार प्रवाहच्या स्वाभिमान मालिकेच्या निमित्ताने मनासारखं प्रोजेक्ट मिळाल्यामुळे मी ही भूमिका स्वीकारली. अदिती सूर्यवंशी असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. अदिती सूर्यवंशी दापोलीच्या एका कॉलेजमधील प्रोफेसर आहे. जी अत्यंत बुद्धिमान आणि विचारी आहे. ती काळाच्या पुढचा विचार करणारी आहे. स्वाभिमान मालिकेच्या कथेतील नायिका म्हणजेच पल्लवीची ती आदर्श आहे. पल्लवीसाठी अदिती मॅडम हेच तिचं विश्व आहे. पल्लवीमध्ये असणारी चमक अदितीला उमगते आणि ती खूप पुढे जावी अशी अदितीची इच्छा असते.’

Post a Comment

 
Top