0

 पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण चांगलेच तापले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी हुगलीमध्ये एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी मोदींना देशातील सर्वात मोठा दंगलखोर म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, जसे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झाले, मोदींसोबत त्यापेक्षाही वाईट होईल. हिंसेतून काहीच मिळणार नाही.

ममता पुढे म्हणाल्या की, 'बंगालवर बंगालचेच राज्य असेल. गुजरातचे राज्य बंगालवर होऊ देणार नाही. मोदी बंगालवर राज्य करू शकणार नाही. गुंडांना बंगालवर राज्य करू देणार नाही.' ममता बॅनर्जींनी भाचा अभिषेक बॅनर्जीच्या पत्नीची CBI कडून झालेल्या चौकशीवर म्हटल्या की, हा बंगालमधील महिलांचा अपमान आहे.

'मोदी आणि शहा नकारात्मकता पसरवत आहेत'

ममता पुढे म्हणाल्या की, भाजप प्रत्येक वेळेस तृणमूलला 'टोलेबाज' म्हणतो. पण, मी म्हणते की, भाजप दंगलखोर आणि धंदेबाज आहे. येणाऱ्या विधानसभेत मी गोलकीपर असेल आणि भाजपला एकही गोल करू देणार नाही. यावेळी त्यांनी शहांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मोदी आणि शहा सोबत मिळून नकारात्मकता पसरवत आहेत.



Post a Comment

 
Top