अनेक बड्या प्रॉडक्शन हाऊसेसनी त्यांच्या चित्रपटांच्या रिलीज डेटची घोषणा करायला सुरुवात केली आहे. यशराज फिल्म्सने बुधवारी संध्याकाळी त्यांच्या पाच मोठया चित्रपटांच्या रिलीज डेट जाहिर केल्या आहेत. यानुसार अभिनेता अक्षय कुमार स्टारर पृथ्वीराज हा चित्रपट यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी शाहिद कपूर स्टारर जर्सी हा चित्रपटदेखील रिलीज होतोय. त्यामुळे यंदा दिवाळीत अक्षय आणि शाहिदच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.
Post a Comment