0

 



फाेन न उचलल्याचा राग अालेल्या एका सराईत गुन्हेगाराने घरात घुसून युवतीसह तिच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याची घटना म्हसरुळच्या केतकीनगर येथे घडली. सूरज चारोस्कर असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून घटनेनंतर ताे फरार झाला आहे. दरम्यान, म्हसरुळसह मखमलाबाद, पंचवटी व सिडकाे परिसरात टाेळक्यांकडून दगडफेक व शस्त्राने हल्ला करण्याचा घटना घडत असून पाेलिसांचा वचकच राहिला नसल्याचे दिसून येत अाहे.

पाेलिसांची माहिती व पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित सूरज चारोस्कर हा परिचित असून ताे घराबाहेर उभा राहून मुलीला शिवीगाळ करत होता. जाब विचारताच त्याने घरात घुसून मुलीला व कुटुंबाला मारहाण केली. ही बाब पाेलिसांना कळववली असता पाेलिस दाखल हाेईपर्यंत तो फरार झाला.

ठाेस कारवाईचा विसर

शहरातील गुन्हेगारी उच्चाटन व पेालिसांचा दरारा निर्माण करण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्तांनी काेम्बिंग,ऑल आउटसारख्या नियमित माेहिमा राबविल्या हाेत्या. मात्र, या कारवायांचाही यंत्रणेला साेयीस्कर विसर पडला असून गुन्हेगारांना वॉरंट बजावत रात्री अचानक केलेली कारवाई असाे की उपनगरमधील म्हस्के टोळीचे २३ गुन्हेगारांवर मोक्का वगळता अद्याप ठोस कारवाई न झाल्याने अधिकारी, कर्मचारीही वरिष्ठांच्या भूमिकेविषयी अाश्चर्य व्यक्त करीत अाहेत. विशेष म्हणजे, अागामी मनपा निवडणूकीसाठी इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन करताना गुंड-पुंडांना हाताशी धरले जात असल्याने वेळीच अशा गुन्हेगारांच्या मुसक्या अावळण्यासाठी माेहिमा राबविण्याची गरज अाहे.

दहशतीचे सावट कायम; अडीच महिन्यांत ९४ गुन्हे

हाणामारी, टाेळक्याकडून रस्त्यावर अडवून मारहाण, शस्त्रे घेऊन फिरणे, दगडफेकीच्या घटना सातत्याने मखमलाबाद नाका, पंचवटी गजानन चाैक, सिडकाेतील त्रिमूर्ती चाैक, नाशिकराेड उपनगर भागात घडत अाहेत. या हाणामारी, दहशतीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. डिसेंबर ते १२ फेब्रुवारी या कालावधीत ९४ हाणामारीचे गंभीर गुन्हे यात पाच प्राणघातक हल्याचे अाणि पाच खुनाचे गुन्हे दाखल झाले अाहेत. या गुन्ह्याची आकडेवारी बघता पोलिसांचा धाकच राहिला नसून गुन्हेगार माेकाट दिसून येत अाहे.

सराईत गुन्हेगाराने केली घरात घुसून युवतीला मारहाण

अश्लील चाळे करणाऱ्या युगुलास हटकल्याचा राग अाल्याने प्रियकराने मित्रांच्या मदतीने तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सिडकाेच्या अश्विननगरातील राजे संभाजी स्टेडियम परिसरात शुक्रवारी (दि. १२) दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी राहुल माळोदे व आदित्य सुतार यांना रात्री गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली. खून झालेला तरुणाचे नाव योगेश प्रकाश तांदळे (२७, रा. पंडितनगर, मोरवाडी) असे असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी दुपारी स्टेडियममध्ये संशयित तरुण प्रेयसीसोबत अश्लील चाळे करत असताना योगेश तांदळे, गौरव भोये, उमेश पाटील यांनी त्यांना हटकले. काही वेळाने हे युगुल तेथून निघून गेले. दुपारी तीनच्या सुमारास संशयित दोघे तरुण पुन्हा स्टेडियममध्ये आले. योगेशला समोर बघताक्षणी दाेघांनी त्याच्यावर हल्ला केला. एकाने त्याला पकडून ठेवत दुसऱ्याने त्याच्यावर गुप्तीने वार केला. पोटात गुप्ती आरपार गेल्याने काही वेळात त्याचा मृत्यू झाला. दोघे दुचाकीने फरार झाले.

Post a Comment

 
Top