टोकियोहून भास्करसाठी ज्युलियन रयाल
जपानमध्ये बुधवारपासून काेराेनाच्या विराेधात लसीकरणाला सुरुवात हाेत आहे. लसीकरणात प्रचंड विलंब झालेला जपान हा सर्वात शेवटचा विकसित देश आहे. या विलंबाबद्दल जपानवर टीकाही हाेत आहे. जपान सरकारने रविवारी अमेरिका निर्मित फायझर लसीच्या वापराला हिरवा कंदील दाखवला. घाेषणेच्या ४८ तासांनंतर लसीची पहिली खेप जपानमध्ये दाखल झाली आहे. सर्वात आधी ३७ लाख आराेग्य कर्मचारी व इतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
जपानमध्ये लसीकरणाची वाट अत्यंत बिकट अशी ठरली. आशी वृत्तपत्राच्या पाहणीनुसार जपानमधील ६२ टक्के लाेकसंख्येला लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. क्याेडाे न्यूजच्या पाहणीत जपानमध्ये सामान्य लाेक लसीकरणाबाबत संभ्रमात आहेत. पाहणीत केवळ ६३.१ टक्के लाेकांनी डाेस लवकर मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. २७.४ टक्के लाेकांनी मात्र लस घ्यायची नाही, असे कळवले आहे. ४० ते ६० वयाेगटातील महिला लसीबाबत मुळीच इच्छुक नाहीत. दुसरीकडे काेराेना संकटाला ताेंड देण्यासाठी घाईघाईने लस आणण्यात आल्याची टीका केली जात आहे.
आराेग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा, उणे 75 अंशांत साठवण्याची समस्या यशस्वी लसीकरणाच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. देशभरात मेडिकल केंद्रापर्यंत लस पाेहाेचवण्याची व्यवस्था नाही. देशाच्या दुर्गम भागात लसीकरण करण्यासाठी व्यावसायिकांची कमतरता भासते आहे. आराेग्य अधिकारी हा तुटवडा भरून काढण्यासाठी ११ हजार वैद्यकीय चिकित्सकांच्या शाेधात आहेत. आणखी एक समस्या आहे. फायझर देण्यासाठी डिझाइन केेेलेली सिरिंजची कमतरता आहे. सध्या उपलब्ध सिरिंजमध्ये सीरम जास्त साठवले जाते. त्यामुळे लाखाे डाेस वाया जाऊ शकतील. प्रशासनाला देखील त्यामुळे अनेक प्रश्न पडलेले दिसतात.
जपानने अनेकदा मागे घेतली लस १९९३ मध्ये रुबेलासह अनेक लसी मागे घेण्यात आल्या हाेत्या. कारण त्यामुळे मॅनिंजायटिस आजार हाेत हाेता. २०११ मध्ये मॅनिंजायटिस व न्यूमाेनियाची लस मागे घ्यावी लागली हाेती. या लसीमुळे चार मुलांनी प्राण गमावले हाेते. त्यानंतर सरकारने पेपिलाेमा विषाणूच्या विराेधात लस देण्याचा कार्यक्रम बंद केला हाेता. त्यामधून काही लाेक सर्व्हायकल कर्कराेगाचे शिकार झाले हाेते.
काेराेनाची रुग्णसंख्या घटत आहे हीच गाेष्ट जपानच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. देशात साेमवारी एकूण ९६५ नवे रुग्ण आढळून आले. १६ नाेव्हेंबरनंतर बाधितांची संख्या १ हजाराहून कमी झाली आहे. देशात काेराेनाचे ३.९ लाख रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत ७०५६ लाेकांचा मृत्यू झाला.
Post a Comment