0

 पेट्रोल-डीझेलच्या वाढत्या किमतींवरून केंद्राचा मुखपत्रातून समाचार घेत असतानाच शिवसेनेने पोस्टरबाजी सुद्धा केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील पेट्रोल पंपांवर पोस्टर लावून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. 2014 च्या निवडणुकीत मोदींनी 'अच्छे दिन' आणू पेट्रोल-डीझेलच्या किमती कमी करू असे आश्वासन दिले होते. दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. उलट 2014 आणि 2015 च्या तुलनेत आता इंधनाच्या किमतींमध्ये कमालीची वाढ झाली असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. शिवसेना युवा शाखा अर्थात युवा सेनेने मुंबईतील पेट्रोल पंपांवर पोस्टर लावून त्यावर हेच का अच्छे दिन असा प्रश्न विचारला. त्यावर 2015 मध्ये पेट्रोलचे दर कसे होते आणि आता किती आहेत याची तुलना करण्यात आली आहे.

मुंबईतील बांद्रा परिसरात लागलेल्या पोस्टरनुसार, 2015 मध्ये पेट्रोलची किंमत 64.60 रुपये प्रति लिटर होती. आता पेट्रोलचे भाव 96.62 रुपये झाले आहेत. मुंबईत डीझेलचे भाव त्यावेळी काय होते आणि आता काय आहेत हे देखील दाखवण्यात आले आहे.Post a Comment

 
Top