0

 कोरोना रुग्णांची संख्या कमी झालीये म्हणून लोकांनी हलगर्जीपणा करू नये, ही सूचना दिल्ली AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये रविवार 'इंडियाज फाइट अगेंस्ट द कोव्हिड' सेशनमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्यामुळे आता अजूनच काळजी करण्याची गरज आहे.

अँटीबॉडी पॉवरफुल नाही

डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले की, ‘कोरोना संपलेला नाही. व्हॅक्सीन दिल्यानंतरही कोरोनाचा काही अंश शरीरात राहू शकतो. त्यामुळे मास्कसोबतच स्वच्छता, सोशल डिस्टेंसिंग, आयसोलेशनसारख्या कोरोना नियमांचे पालन केलेच पाहीजे. ब्राझीलमध्ये 70% लोकांचा कोरोना बरा झाला होता, पण काही दिवसानंतर परत त्यांना कोरोना झाला. कारण, या आधी शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडी नवीन स्ट्रेनशी फाइट करण्यास सक्षम नाहीत.’

लोक व्हॅक्सीनबाबत जागरुक नाही

फेस्टिव्हलमध्ये सायंटिस्ट आणि रिसर्चर गगनदीप कांगदेखील आले होते. यावेळी ते म्हणाले की, व्हॅक्सीनबाबत आधीपासूनच लोकांच्या मनात शंका येत आली आहे. पोलियोबाबतही लोकांच्या मनात शंका होती. सध्या लोकांना व्हॅक्सीनचे महत्व माहित नाही. याचे कारण म्हणजे, कमी इन्फॉर्मेशन किंवा कोणतीच इन्फॉर्मेशन नसणे आहे.Post a Comment

 
Top