0

 



देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. आज 10 व्या दिवशीही तेल कंपन्यांनी दरवाढ केली आहे. याचा परिणाम मह्णून आता मुंबईत पेट्रोलने 96 रुपयांची पातळी गाठली आहे. इंधन दरवाढ झाल्यामुळे लवकरच महागाई वाढण्याची शक्यता आहे. आज कंपन्यांनी पेट्रोल दरात 35 पैसे आणि डिझेलमध्ये 32 पैसे वाढ केली. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव 96.32 रुपये झाला आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती आता 90 रुपये लीटरच्या जवळपास आहेत. या किंमती 89.88 एवढ्या आहे. डिझेल येथे 80 रुपये 27 पैसे लीटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 96.32 आणि डीझेल 87.36 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. आज पेट्रोल 35 आणि डीझेलने 32 पैशांनी वाढ झाली.

देशाच्या प्रमुख शहरांमध्ये आज पेट्रोल-डीजलेच्या किंमती

Post a Comment

 
Top