देशात कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. देशभरातील 91 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली. त्यापैकी 34 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातून आहेत. यासोबतच, कर्नाटकचे 16, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, गुजरात आणि बिहारच्या प्रत्येकी 4-4, आणि केरळमधील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या देखील अधिक आहे.
एका दिवसात वाढले 4,412 सक्रीय रुग्ण
रविवारी देशभर 13,979 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 9,476 रुग्ण बरे झाले आहेत. अर्थातच 4,412 सक्रीय रुग्णांची वाढ झाली आहे. ही वाढ 87 दिवसांत सर्वाधिक आहे. तसेच रविवारी कोरोनामुळे 79 जणांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी 25 नोव्हेंबर रोजी 7,234 अॅक्टिव्ह रुग्ण वाढले होते. अॅक्टिव्ह किंवा सक्रीय रुग्ण म्हणजे असे रुग्ण की ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
राज्यातील कोरोनाची आकडेवारी...
राज्यात रविवारी 6,971 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. 2,417 रुग्ण बरे झाले, तर 35 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 21 लाख 884 लोकांना कोरोनाची लागण
Post a Comment