लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी अलीकडेच १०० के-९ वज्र तोफांचा सैन्यात समावेश केला होता. आता त्यापैकी तीन तोफांची लडाखमधील शिखरांवर तैनाती केली आहे. तोफा बुधवारी लेहमध्ये दाखल झाल्या होत्या.
या तोफांना शिखरांवरील लष्करी तळापर्यंत पोहोचवले जात आहे. तेथे या तोफांचे परीक्षण केले जाऊ शकते. शत्रूच्या विरोधात त्यांचा वापर कसा केला जाऊ शकतो अशा दिशेने चाचपणी होऊ शकते. लडाखमध्ये काही महिन्यांपूर्वी निर्माण झालेल्या तणावाचा विचार करून भारताची सुरक्षेबाबत आणखी जोरदार तयारी सुरू आहे. तोफांची क्षमता लक्षात घेऊन तीन अतिरिक्त रेजिमेंटसाठी आणखी दोन किंवा तीन तोफांची मागणी केली जाऊ शकते. १९८६ नंतर भारतीय सैन्याने नवीन तोफांचा शस्त्रागारात समावेश केला नव्हता. मात्र आता लष्कर के-९ वज्र , धनुष व एम-७७७ अल्ट्रा लाइट तोफांचा ताफ्यात समावेश करत आहे.
सुरतजवळील हजिरामध्ये के-९ वज्रची निर्मिती : गुजरातमधील सुरतजवळील हजिरामध्ये लार्सन अँड टुब्रोच्या कारखान्यात या ताेफा तयार केल्या जात आहेत. यासंबंधी सर्व प्रक्रियेवर नरवणे स्वत: निगराणी ठेवत आहेत. लष्कराने दक्षिण काेरियाच्या कंपनीकडून अशा १०० तोफांची खरेदी करण्याचा सौदा केला होता. के-९ वज्र तोफा दक्षिण कोरियाच्या के-९ थंडर तोफांची स्वदेशी आवृत्ती आहे. या स्वयंचलित ताेफांची मारक क्षमता ३८ किमीपर्यंत आहे. या तोफा दक्षिण काेरियासोबत संयुक्त प्रकल्पांतर्गत तयार केल्या आहेत
Post a Comment