भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने इंग्लंडला 317 धावांनी पराभूत केले आहे. गेल्या 89 वर्षांच्या इतिहासात भारताचा इंग्लंडविरुद्ध हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. यापूर्वी 1986 मध्ये लीड्सच्या मैदानात भारताने इंग्लंडला 279 धावांनी पराभूत केले होते. यासोबतच अक्षर पटेलने आपल्या टेस्ट डेब्युमध्ये तब्बल 5 गडी बाद केले. असे करणारा तो भारताचा 6 वा गोलंदाज ठरला आहे. या विजयासह भारताने टेस्ट सिरीजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहहे. पुढील टेस्ट सामना 24 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. मराठीत स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मोइन अलीने सर्वाधिक 43 धावा तर कर्णधार जो रूटने 33 धावा काढल्या. इंग्लंड टीमचे 6 फलंदाज दशक सुद्धा पूर्ण करू शकले नाहीत. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताकडून अक्षर व्यतिरिक्त रविचंद्रन अश्विनने 3 आणि कुलदीप यादवने 2 गडी बाद केले. भारताने पहिल्या इनिंगमध्ये 329 धावा आणि इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये 134 धावा काढल्या होत्या. टीम इंडियाने दुसऱ्या इनिंगमध्ये 286 धावा काढल्या.
दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडची सुरुवातच वाइट झाली. ओपनर डॉम सिबली 3 धावा काढून तर नाइट वॉचमन जॅक लीच खाते न उघडताच तंबूत परतला. या दोघांनाही अक्षर पटेलने बाद केले. तर रॉरी बर्न्सला 25 धावांवर अश्विनने विराट कोहलीच्या हातात कॅच देऊन बाद केले.
चौथ्या दिवशी इंग्लंडने 3 विकेटवर 53 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. अश्विनने आजच्या आपल्या पहिल्याच बॉलवर डॅनियल लॉरेंसला बाद केले. तो 26 धावाच करू शकला. स्टोक्स कर्णधारासोबत मिळून आपल्या टीमला सांभाळेल असे वाटत होते. पण, इंग्लंडच्या समर्थकांचा अपेक्षाभंग झाला. स्टोक्सला अश्विनने कोहलीच्या हातून झेलबाद केले. पोप तर अवघ्या 12 धावांवरच तंबूत परतला. त्याने अक्षरच्या चेंडूवर इशांत शर्माच्या हातात कॅच दिला.
Post a Comment