0

 आज श्रीदेवी यांची तिसरी पुण्यतिथी आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये 300 चित्रपटांमध्ये काम करणा-या श्रीदेवी यांचे 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्याने निधन झाले होते. श्रीदेवी यांच्या आयुष्याबद्दल बर्‍याच गोष्टी ऐकायला मिळतात. यामधील 6 रंजक किस्से...

जयललितांसोबत केले होते काम
श्रीदेवी यांनी हिंदीसह तामिळ, कन्‍नडसह अनेक भाषांमधील चित्रपटात काम केले. तामिळनाडूच्‍या माजी मुख्‍यमंत्री जयललिता यांच्‍यासोबतही त्‍यांनी चित्रपटात काम केले होते. जयललिता यांच्‍या 'अथी पराश्‍क्‍ती' या चित्रपटात त्‍यांनी बाल कराकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात जयललिता यांनी 'शक्‍ती देवी'ची तर श्रीदेवी यांनी त्‍यांच्‍या माडीवर बसलेल्‍या बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. 1976 मध्‍ये श्रीदेवी यांनी 'सोलावां सावन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केले होते. 'हिम्‍मतवाला' चित्रपटाने त्‍यांना एक नवी ओळख मिळवून दिली होती.


Post a Comment

 
Top