0

 


तीन कृषी कायद्यांविरुद्ध शेतकरी आंदोलन सुरू असताना पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवला. प्रमुख विरोधी पक्ष असलेले आप, शिरोमणी अकाली दल व भाजपचा सफाया करत काँग्रेसने ७ महापालिका व १०९ नगर परिषदांच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला. काँग्रेसने अबोहर, भटिंडा, कपूरथळा, होशियारपूर, पठाणकोट, मोगा आणि बाटला पालिकेत विजय मिळवला आहे. भाजप खासदार सनी देओल यांच्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातील सर्व २९ जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत.

८ महापालिका व १०९ नगर परिषदा-नगरपंचायतींसाठी १४ फेब्रुवारीला मतदान झाले. २,३०२ प्रभागांत एकूण ९,२२२ उमेदवार मैदानात होते. मोहाली पालिकेच्या दोन वॉर्डांत फेरमतदानाचे आदेश असल्याने या ठिकाणी मतमोजणी गुरुवारी होईल. पालिका निवडणुकीतील विजयाबद्दल काँग्रेसचे राज्यसभा खासदार दीपेंद्र हुडा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचे अभिनंदन केले. हुडा यांनी सोशल मीडियावर लिहिले-हे निकाल ‘बदलत्या काळा’चे सूचक आहेत.

भटिंड्यात ५३ वर्षांत प्रथमच काँग्रेसचा महापौर : पंजाब सरकारमधील मंत्री मनप्रीतसिंग बादल म्हणाले, भटिंड्यात ५३ वर्षांत प्रथमच काँग्रेसचा महापौर होईल. फिरोजपूरच्या सर्व ३३ प्रभागांत काँग्रेसला विजय मिळाला आहे.

पुढील निवडणुकीआधीची ही तर सेमीफायनल
राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीची अग्निपरीक्षा म्हणून याकडे पाहिले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी दिलासादायक आहेत, तर आप, भाजप आणि अकाली दलासाठी निराशाजनक आहेत.

Post a Comment

 
Top