0

 


अमेरिकेत रविवारी एक मोठा अपघात टळला आहे. हजारो फूट उंचीवर हवेत असताना अचानक बोइंग 777 चे इंजिन फेल झाले आणि काही क्षणातच इंजिनने आग पकडली. या कमर्शियल विमानात 231 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते. इंजिनला आग लागल्याची कळताच पायलटने तात्काळ विमानाचे लँडिंग केले आणि सर्वांचे प्राण वाचले.

रनवेवरुन उड्डाण घेताच लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट डेनवरवरुन होनोलुलुकडे जात होती. डेनवर एअरपोर्टवरुन उड्डाण घेतल्यानंतर काही मिनीटातच विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली. यावेळी, नॅशनल ट्रांसपोर्ट सेक्योरिटी बोर्ड (NTSB) ने घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे.
Post a Comment

 
Top