हाँगकाँगमध्ये वादग्रस्त राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू झाला आहे. यामुळे आता चीनला हाँगकाँगचे तरूण बंड करतील, अशी भीती सतावू लागली आहे. म्हणूनच हाँगकाँगच्या नवीन पिढीवर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा निश्चय चीनने केला आहे. चीनच्या जिनपिंग सरकारने हाँगकाँगच्या शाळा, महाविद्यालयात चीनविषयी निष्ठा दाखवणारे धडे शिकवण्यास सुरूवात केली आहे. ड्रॅगनने हाँगकाँगच्या ७ हजार वर्षांच्या इतिहासाला पुसून टाकले आहे. सोबतच सुमारे ७२६ कोटी रुपये खर्चून इतिहासाची नवी पुस्तके लिहून घेतली आहेत. त्यापैकी एक पुस्तक ८०० पानांचे आहे. त्यात चीनचे गुणगान करण्यात आले आहे आणि चीनला हाँगकाँगचे रक्षक म्हटले आहे. या पुस्तकांत चीनच्या पीपल लिबरेशन आर्मी तसेच ग्रेट वॉल ऑफ चायनासह प्रमुख संकेतस्थळांबद्दल सांगण्यात आले आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार २०१९ मध्ये व्यापक पातळीवर विरोधाभासी निदर्शनेही झाली.
बीजिंग समर्थक अधिकाऱ्यांनी उदार मुल्यांना प्रोत्साहन देणे आणि हाँगकाँग कट्टरवादी होण्यामागे शिक्षण प्रणालीवर ठपका ठेवला होता. त्या आंदोलनात लहान मुलेही सहभागी झाली होती. त्यावरून चीन हाँगकाँगच्या मुलांसमोर देशाची महान नेतृत्वासारखी प्रतिमा तयार करू पाहत आहे. या पुस्तकांच्या आडून मुले देशाच्या सुरक्षेच्या नावाखाली चीनविषयी देशप्रेम शिकतील, असा चीनचा उद्देश आहे. म्हणजेच नव्या पिढीने चीनविरोधात बंडाची भावना बाळगू नये, ही गोष्ट त्यांना लहान वयात मिळावी, असे चीनला वाटते. हाँगकाँग नव्हे तर मकाऊतील लोकांनी देखील स्वत:ला चीनचा प्रदेश मानावे, असा त्यामागी उद्देश आहे. चीन मकाऊला देखील आपला भाग मानतो. तो चीनचा विशेष प्रशासकीय भाग आहे. चीनने एका करारांतर्गत १९९९ मध्ये त्यास पोर्तुगालला सोपवले होते.
तियानमेन नरसंहारही वगळला
१९८९ मध्ये लोकशाही बहालीवरून जनआंदोलन झाले होते. या दरम्यान बीजिंग येथील तियानमेन चौकावर एक लाखांहून जास्त विद्यार्थी एकत्रित आले होते. या बंडाला चिरडण्यासाठी चीनने मार्शल लॉ लागू केला होता. तोफा, रणगाड्यांनी आंदोलकांवर मोठी कारवाई
Post a Comment