जगात सेकंड हँड कारची मोठी बाजारपेठ आहे. कमी उत्पन्न असलेले लोक सेकंड हँड कार खरेदीस प्राधान्य देतात. परंतु कोरोना काळ असल्याने अनेक लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे अनेकांना कारही विकावी लागली. रोजगार नसल्याने कार खरेदी मंदावली. ब्रिटनमध्ये जुन्या कारचा बाजार ३१ टक्के घटला. जागतिक महामारीच्या आधी २०१९ मध्ये २३.१० लाख जुन्या कारची विक्री केली जात होती. परंतु २०२० मध्ये त्यात घट होऊन विक्री १६ लाख झाली आहे. एक वर्षात ७.१० लाखांवर कार पडून आहेत. या कारला ब्रिटनच्या मोठमोठ्या स्टेडियममध्ये उभे करावे लागत आहे. मोटार उत्पादक व ट्रेडर्सच्या म्हणण्यानुसार जुन्या कारच्या बाजारपेठेत गेल्या २८ वर्षांत पहिल्यांदाच मोठी घसरण झाली आहे. ब्रिटनची लोकसंख्या ६.७० कोटी आहे. ४२ लाखांहून जास्त कार आहेत.
युरोपात नव्या कार बाजारात २६ टक्के घसरण
युरोपात नवीन कारचा बाजारही २६ टक्के घसरला आहे. युरोपीय ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (एसीईए) ताज्या आकडेवारीनुसार युरोपातील सर्व पाच सर्वात मोठ्या बाजारांत घसरण नोंदवण्यात आली. स्पेनमध्ये ५१.५ टक्के सर्वात जास्त घट राहिली. जर्मनी-३१ टक्के, ब्रिटन-३.०५ टक्के, इटली-१४ टक्क्यांपर्यंत नवीन कारची विक्री झाली नाही. फ्रान्समध्ये सर्वाधिक घसरण ५.८ टक्के एवढी राहिली. स्वीडन मात्र त्यास अपवाद राहिला. तेथे कार विक्री सकारात्मक होती. येथे गतवर्षीच्या तुलनेत नवीन कारची विक्री २२.५ टक्के जास्त झाली.
Post a Comment