0

 

पेट्रोल आणि डीझेलच्या भावांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. सलग 12 व्या दिवशी ही वाढ झाली आहे. नवीन दरांप्रमाणे आता मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचे भाव चक्क 97 रुपयांवर पोहोचले. तर दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 90.58 रुपयांनी विकले जात आहे. दिल्लीत आज डीझेलच्या किमती 37 तर पेट्रोलच्या किमती लिटरप्रमाणे 39 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत.

राजस्थानच्या गंगानगरमध्ये पेट्रोलचे भाव तब्बल 101.22 आणि मध्य प्रदेशातील अनूपनगर येथे 101 रुपये प्रति लिटर भाव झाले आहेत. 4 फेब्रुवारीपासून आतापर्यंत रोज पेट्रोल आणि डीझेलच्या भावात वाढ होत आहे. अर्थात या महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये 14 व्या वेळी वाढ करण्यात आली आहे.

फेब्रुवारीत इंधनाचे दर 14 वेळेस वाढवण्यात आले. या 14 दिवसांत दिल्लीत पेट्रोल 4.03 रुपयांनी तर डीझेल 4.24 रुपयांनी महागले आहे. तत्पूर्वी जानेवारी महिन्यात 10 वेळा इंधन महाग झाले होते. गेल्या महिन्यात दिल्लीत पेट्रोलच्या किमती प्रति लिटर 2.59 रुपयांनी तर डीझेलच्या किमती 2.61 रुपयांनी वाढवण्यात आल्या. अर्थातच या वर्षाच्या सुरुवातीला 2 महिने सुद्धा पूर्ण झाले नाहीत आणि पेट्रोल 6.77 रुपये प्रति लिटर आणि डीझेल 7.10 रुपये प्रति लिटर महाग झाले आहे.

पेट्रोल-डीझेल महागण्याची 3 कारणे
कच्च्या तेलाचे भाव 13 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर आहेत. यावर्षी कच्चा तेलाच्या किमतीत 23% वाढ झाली. 1 जानेवारी रोजी ब्रेंट क्रूड ऑइलचे रेट 51 डॉलर प्रति बॅरल होते. तेच आता 63 डॉलरपेक्षा अधिक झाले आहे. याचे कारण म्हणजे, जगभरात अर्थव्यवस्थेला आलेली सकारात्मक उभारी मानले जात आहे. यातून इंधनाची मागणी वाढली. केंद्र सरकार पेट्रोल-डीझेलवर अबकारी कर कमी करण्यास तयार नाही. एकट्या दिल्लीचा विचार केल्यास दिल्लीत एका लिटर पेट्रोलच्या मागे केंद्राकडून 32.90 रुपये आणि डीझेलवर 31.80 रुपये एवढा अबकारी कर लादला जातो. राज्य सरकार त्यात वेगळा व्हॅट लावतात. दिल्ली राज्य सरकारकडून एका लिटर पेट्रोलवर 20.61 रुपये व्हॅट म्हणून आकारले जातात.


Post a Comment

 
Top