0

 लोकप्रिय पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचे बुधवारी निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, याच काळात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावली होती. सरदूल यांनी पंजाबी चित्रपटसृष्टीमधील अनेक गाणी गायली आहेत आणि ती हिट देखील झाली होती. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. कॉमेडियन कपिल शर्मा, दलेर मेहंदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरदूल यांच्या निधनाची माहिती देत श्रद्धांजली वाहिली आहे.Post a Comment

 
Top