0

 


कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 85 वा दिवस आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून शेतकरी आज रेल्वे रोको आंदोलन करत आहे. दुपारी 12 ते संध्याकाळी 4 पर्यंत हे आंदोलन सुरू होते. शांततेत आजचे शेतकऱ्यांचे आंदोलन पार पडले.

भारतीय शेतकरी युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले होते की, ट्रेन थांबवत असताना मुलांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी म्हटले होते की, त्यांना शांततापूर्ण आंदोलन करायचे आहे. यासोबतच आपले मत त्यांना जनतेपर्यंतही पोहोचवायचे आहे. कुणाला त्रास देण्याचा त्यांचा हेतू नाही. यामुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मुलांना दूध-पाण्याची व्यवस्था त्यांनी केली होती.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनात राजकीय पक्षांचाही समावेश आहे. पाटणामध्ये जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक) चे कार्यकर्त्यांनी ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास पहिलेच रेल्वे रोखण्यास सुरुवात केली. काही कार्यकर्ते रेल्वे रुळावर झोपले, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

राजस्थान रायपूर आणि आजुबाजूच्या परिसरांमध्येही रेल्वे रोखल्या जात आहेत. जयपूरमध्ये जगतपूरा रेल्वे स्टेशनवर आंदोलकांचा जास्त प्रभाव दिसत आहे. यासोबतच अलवर, बूंदी, कोटा, झुंजुनू आणि हनुमानगढमध्येही आंदोलकांनी रेल्वे रोखल्या.

Post a Comment

 
Top