0

 देशात कोरोनाचे वाढते प्रकरण पाहता दिल्ली सरकार अलर्ट झाले आहे. आता 5 राज्यांमधून दिल्लीत जाणाऱ्या लोकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे आवश्यक असणार आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबवरुन दिल्लीत येणाऱ्या लोकांना निगेटिव्ह RT-PCR दाखवल्यानंतर दिल्लीमध्ये प्रवेश मिळेल. हे नियम 27 फेब्रुवारीपासून 15 मार्चपर्यंत लागू राहतील.

देशात कोरोना रुग्णांचा वेग झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी 11 राज्यांमध्ये रिकव्हरीपेक्षा जास्त कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढली. यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रात 6,218 संक्रमित आढळले. महाराष्ट्राच्या आतापर्यंत सर्व 36 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा वेग धरला आहे. येथे रोज मिळणाऱ्या रुग्णांमध्ये जबरदस्त वाढ होत आहे. सर्वात जास्त पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावतीसारख्या जिल्ह्यांमधून रुग्ण आढळत आहेत.

महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातच्या 4 जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढण्याचा वेग वाढला आहे. यामध्ये अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोटचा समावेश आहे. मध्य प्रदेशच्या 3 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिघडत आहे. यामध्ये इंदुर, भोपाळ आणि बैतूलचा समावेश आहे. अशा प्रकारे देशाच्या 122 जिल्हे आहेत, जेथे कोरोनाच्या केस सलग वाढत आहे.

24 तासांमध्ये 100 लोकांनी गमावला जीव
देशात मंगलवारी 13 हजार 462 नवीन रुग्ण आढळले. 13 हजार 659 लोक रिकव्हर झाले आणि 100 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 कोटी 10 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1 कोटी 7 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1 लाख 56 हजार 598 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 44 हजार 27 रुग्ण असे आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहे.



Post a Comment

 
Top