0

 मैने प्यार किया' या चित्रपटातून सलमान खानबरोबर डेब्यू करणारी अभिनेत्री भाग्यश्री आज 52 वर्षांची झाली आहे. 23 फेब्रुवारी 1969 रोजी जन्मलेली भाग्यश्री चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही मालिकांमध्येही झळकली आहे. सांगलीचे राजा विजयसिंह राव माधवन राव पटवर्धन यांच्या घरी भाग्यश्रीचा जन्म झालाकुटुबीयांच्या मनाविरुद्ध केले लग्न

1989 मध्ये आलेल्या राजश्री प्रॉडक्शनच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटाद्वारे भाग्यश्रीने सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी तिला 1 लाख रुपये मानधन मिळाले होते, तर सलमान खानला फक्त 30 हजार रुपये देऊन साइन करण्यात आले होते. या चित्रपटानंतर तिने त्यागी (1992), ​​पायल (1992), घर आया मेरा परदेसी (1993) सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. मात्र तिचे हे चित्रपट फ्लॉप ठरले.

वयाच्या 19 व्या वर्षी केले लग्न

वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी भा


ग्यश्रीने तिचा बालपणीचा मित्र हिमालय दासानीशी लग्न केले. भाग्यश्री हिमालयला पहिल्यांदा भेटली जेव्हा ती शाळेत शिकत होती. भाग्यश्रीच्या आईवडिलांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यामुळे तिने सलमान खान आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत मंदिरात हिमालयसोबत लग्न केले होते..


Post a Comment

 
Top