0

 जीव झाला येडापिसा' ही मालिका सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राचा जीव यांवर जडला. प्रेक्षकांची मने मालिकेतील सर्वच पात्रांनी जिंकली. द्वेषातून सुरू झालेलं शिवा सिध्दीचे नाते प्रेमाने बहरलं. कठीण परिस्थितीला या दोघांनी खंबीरपणे, मोठ्या धीराने तोंड दिले. अनेक आव्हानं, कसोट्या पार केल्यानंतर आता आपली लाडकी सिध्दी आणि रांगडा शिवादादा यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आले आहेत.सिद्धीने घरी ती आई होणार अशी गोड बातमी दिली. सिध्दीने ही गोड बातमीच देताच दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. मंगलंने सिद्धीचा नेहेमीच दुस्वास केला पण तरीही सिद्धीने त्यांना माया आणि सन्मान दिला. यासगळ्यात काकी, सोनी, यशवंत यांची साथ सिध्दी – शिवाला कायमच मिळत आहे. सगळे गैरसमज, भांडण सरून आता दोघांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले. मालिकेमध्ये बर्‍याच घटना घडत आहेत. पण यातच आनंदाची बातमी म्हणजे नुकताच या मालिकेने 500 भागांचा पल्ला गाठला आहे.


Post a Comment

 
Top