अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका पूजा भट्ट 49 वर्षांची झाली आहे. पूजा भट्टच्या खासगी आयुष्याला वादाची किनार आहे. तिने डॅडी (1989) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचे वडील महेश भट्ट यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यावेळी पूजा फक्त 17 वर्षांची होती. या चित्रपटात तिला अतिशय बोल्ड अंदाजात सादर करण्यात आले होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी पूजाला फिल्मफेअरचा न्यू फेस ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता.वयाच्या 16 व्या वर्षापासून दारुच्या आहारी गेली होती पूजा
पूजाने वयाच्या 16 व्या वर्षापासूनच दारु पिण्यास सुरुवात केली होती. हळूहळू ती दारुच्या आहारी गेली. आणि तिला हे व्यसनच जडले. मात्र दारु पिणे सोडले नाही तर जास्त दिवस आपण जगू शकणार नाही, हे तिला वयाच्या 45 व्या वर्षी समजले. आपण मृत्यूच्या दाढेत पोहोचलोय, असे पूजाला वाटू लागले होते.
आता दारुला स्पर्शही करत नाही पूजा
आता पूजा दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही.
पूजाने 24 डिसेंबर 2016 रोजी दारु पिणार नसल्याची शपथ घेतली होती. आणि त्याला आता चार वर्षे झाली आहेत. तिने दारूच्या बाटलीला स्पर्शही केला नाही.
Post a Comment