0

 

छोट्या पडद्यावर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका 'तुझं माझं जमतंय' प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. यातील शुभू, आशु आणि पम्मी या व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. पण या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक अनोखं सरप्राईज आहे. मालिकेत पम्मीची व्यक्तिरेखा निभावणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला काही वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका सोडावी लागली. पण आता तिची पम्मी ही व्यक्तिरेखा कोण साकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. तर पम्मी म्हणून अभिनेत्री प्रतीक्षा जाधव आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'देवमाणूस' या मालिकेतील मंजुळाच्या भूमिकेतून अभिनेत्री प्रतीक्षा जाधव महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. तिची ही भूमिका प्रचंड गाजली. पण आता प्रतीक्षा पम्मी म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पम्मी म्हणून देखील प्रतीक्षा प्रेक्षकांचं मन जिंकेल यात शंकाच नाही.

Post a Comment

 
Top