जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षादलामध्ये झालेल्या एन्काउंटरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. येथे अजुन काही दहशतवादी लपलेले असल्याची शक्यता आहे. एन्कासउंटर अजुनही सुरू आहे.
यापूर्वी 18 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत शोपियांमध्ये सुरू असलेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. शोपियांमध्ये मारण्यात आलेले तीन दहशतवादी लष्कर-ए-तोयबाच्या लोकल आउटफिट अल बद्रशी संबंधित होते.
गेल्या आठवड्यात श्रीनगरमध्ये पोलिसदलावर झाला होता हल्ला
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये शुक्रवारी दुपारी एका दहशतवाद्यांने पोलिसदलावर फायरिंग केली होती. यानंतर तो फरार झाला होता. यामध्ये दोन जवान शहीद झाले होते. ही घटना बागत परिसरातील बारजुल्लामध्ये घडली होती.
या दिवशीही केला दहशतवाद्यांनी हल्ला
श्रीनगरच्या सोंवर परिसरात गेल्या आठवड्यात बुधवारी दहशतवाद्यांनी एका तरुणावर गोळीबार केला होता. तरुण गंभीर जखमी झाला होता. सोंवर डल झील येथून 10 किलोमीटर दूर आहे. बुधवारीच 24 देशांचे मुत्सद्दी जम्मू काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले होते. त्याच दिवशी श्रीनगरपासून 43 किमी अंतरावरील त्रालमध्ये सुरक्षादलाने मोठ्या स्फोटाचा कट उधळून लावला. यानंतर हिजुबुलच्या स्लीपर सेलच्या 3 सदस्यांना अटक करण्यात आली.
Post a Comment