ड्रयू रॉस सॉर्किन, जेसॉन केराएन
एका क्लर्कच्या चुकीमुळे अमेरिकेतील जागतिक बँकिंग संस्था सिटी बँकेला अब्जावधींचा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षी या क्लर्कने चुकून काही खात्यांतून पैसे ट्रान्सफर केले होते. बँकेने वसुलीचे खूप प्रयत्न केले, परंतु हे पैसे परत आलेच नाहीत. शेवटी बँकेने कोर्टाचे दार ठोठावले. कोर्टानेही यात बँकेला दणका देत हे पैसे वसूल करण्याचा बँकेला अधिकार नाही, असा निकाल दिला.
ऑगस्ट २०२०मधील ही घटना आहे. कॉस्मेटिक कंपनी रेवलॉनने वित्तीय संस्थांकडून २०१६मध्ये ७ वर्षांसाठी मुदतीचे कर्ज घेतले होते. कंपनीची लोन एजंट सिटी बँक आहे. व्याज म्हणून बँकेने वित्तीय कंपन्यांना ५९ कोटी रुपये द्यावयाचे होते. मात्र, चुकून व्याजाऐवजी मुद्दलाची ६,६६० कोटी रक्कम ट्रान्सफर झाली. बँकेने ही चूक मान्य केल्यावर काही कंपन्यांनी २,९६० कोटी रुपये परत केले. मात्र, १० कंपन्यांनी ३,७०० कोटी परत केले नाहीत. बुधवारी फेडरल जज एम. फरमेन यांनी यावर निकाल देताना कर्जदात्या कंपन्या हा पैसा स्वत:कडे ठेवू शकतात, असे फर्मावले. एखादी व्यक्ती किंवा कंपनीला असा पैसा परत मिळवण्याचा अधिकार असला तरी चुकून ट्रान्सफर झालेली ही रक्कम कंपन्या ठेवू शकतात. या प्रकरणात कर्जदात्या कंपन्यांनी असा युक्तिवाद केला होता की, सिटी बँकेने कर्जाचे प्री-पेमेंट केले असावे, असा आमचा समज होता. कर्जदाती कंपनी बँकेच्या चुकीमुळे हा पैसा आपल्या खात्यात आला आहे, असा विचार करू शकत नाही. चुकीमुळे हा व्यवहार झाला होता तर बँकेने तत्काळ पावले का उचलली नाहीत? या प्रकरणात बँक कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवरील संभाषणाचा आधार देत न्यायाधीशांनी नमूद केले की, एवढी गंभीर चूक असताना कर्मचारी परस्परांची टर उडवत होते. तरी बँकेने कारवाई केली नाही. म्हणजेच ही मुद्दाम केलेली चूक होती.
सिक्स आय सिस्टिमने निगराणी, भारतीय टेक कंपन्यांचे कर्मचारीही अडचणीत
बँकेतून ऑनलाइन ट्रान्सफर तीन टप्प्यांत होत होते. याला सिक्स आय सिस्टिम म्हणतात. पहिल्या टप्प्यात एक कर्मचारी रक्कम फ्लेक्सक्यूब प्रोग्रॅममध्ये टाकत होता. बँकेचे बहुतांश प्रोग्रॅम भारतीय टेक कंपनी विप्रोने तयार केले आहेत. दुसऱ्या टप्प्यात विप्रोचा कर्मचारी तपासणी करत होता. तिसऱ्या टप्प्यात अप्रूव्ह केले जाई. या टप्प्यात विनी फ्राटा नामक महिला होती.
Post a Comment