इंडियन प्रीमिअर लीग (IPL) चे 14वे पर्व कोरोनाच्या काळात सुरू होत आहे. यापूर्वीचे टूर्नामेंट UAE मध्ये सप्टेंबर-नोव्हेंबर दरम्यान खेळण्यात आले होते. यावेळी सर्व ग्रुप स्टेज सामने मुंबईच्या 3 मैदानांवर खेळले जाऊ शकतात. तसेच नॉकआउट मॅच अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअममध्ये होऊ शकतात. दिल्ली कॅपिटल्सचे को-ओनर पार्थ जिंदल यांनी ही माहिती दिली.
नेमके काय म्हणाले जिंदल?
पार्थ यांनी वेबसाइट ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना म्हटले, की "इंग्लंड भारत दौऱ्यावर येऊन सिरीज खेळत असेल, फुटबॉल लीग ISL (इंडियन सुपर लीग) गोव्यात आयोजित केले जात असेल, देशातील अनेक शहरांमध्ये विजय हजारे ट्रॉफी (वनडे फॉरमॅट) आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (टी-20 फॉरमॅट) होत असेल तर मला वाटत नाही की IPL देशाच्या बाहेर खेळवले जातील."
मुंबईतील या तीन मैदानावर खेळले जाऊ शकतात सामने
पार्थ पुढे म्हणाले, "मला वाटते की IPL चे स्थळ दोन टप्प्यांमध्ये नियोजित केले जाऊ शकते. त्यापैकी एक व्हेन्यू मुंबई असू शकते. या ठिकाणी वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडिअम आहेत. सराव करण्यासाठी देखील खूप चांगल्या सुविधा आहेत. लीगचे नॉकआउट सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअममध्ये होऊ शकतात." पण, या सर्व शक्यता आहेत आणि माझ्या ऐकण्यात आल्या. जास्तीत-जास्त शहरांमध्ये सामने व्हावे असे मला वाटते. शेवटी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्णय घेतले जातील असेही पार्थ यांनी सांगितले.
मुंबईत आयोजन झाल्यास दिल्लीला फायदा
पार्थ जिंदल यांनी सांगितल्याप्रमाणे, टीम सिलेक्शन पाहिल्यास लक्षात येईल की सर्व मॅच मुंबईत झाल्यास दिल्ली कॅपिटल्सला त्याचा फायदा होईल. आमच्या टीममध्ये स्टीव्ह स्मिथ सुद्धा आहे. त्याची बॅटिंग स्टाइल मुंबईच्या मैदानांसाठी फिट आहे. टीममध्ये मुंबईतून खूप प्लेअर्स आहेत. अर्थातच पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आहेत. समुद्र किनाऱ्यालगत असल्याने मुंबईतील पिचवर बॉल बाउंस होऊन जास्त मूव्हमेंट मिळेल हे खूप महत्वाचे आहे."
Post a Comment