0

 


सकाळचे आठ वाजलेले. बलेसरियांच्या घराजवळचा परिसर पीपीई किट्सने निळाशार झालेला. गेले वर्षभर सगळ्यांच्या परिचयाचे झालेले हे किट्स घालून चाललेली लगबग कोणत्याही कोविड कक्षातील नव्हती. पीपीई किट्स घालून सज्ज ही फौज पोल्ट्रीतील बर्ड किलिंग ऑपरेशनसाठी. पाच जिल्ह्यांतील ९५ पथके यासाठी नवापूरला आली आहेत. प्रत्येक पथकात पाच सदस्य. साधारण साडेचारशे कर्मचाऱ्यांचा जथ्था. सोबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी तळ ठोकून बसलेले. अस्वस्थ होते ते बहात्तर वर्षांचे समदभाई बलेसरिया. डोळ्यादेखत कोट्यवधींच्या कोंबड्या, अंडी आणि पशुखाद्याचा माल खड्ड्यात गाडला जात असताना असहायपणे पहात होते.

पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या बर्ड फ्लूच्या साथीत त्यांच्या सकिस्मा पोल्ट्रीची अशीच धूळदैना झाली होती. मात्र, यंदा कोरोना, लॉकडाऊन या संकटातून उठत असतानाच बर्ड फ्लूचा हा तिहेरी झटका त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना दररोज अाठ लाख अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या नवापुरातील २७ पोल्ट्रींपैकी २२ पोल्ट्रींमधील पाच लाख कोंबड्यांचे किलिंग ऑपरेेशन पूर्ण करण्यात आले आहे. एक कोंबडी वाढविण्यासाठी खर्च येतो ४१० रुपये, पण नुकसानभरपाई मिळणार आहे फक्त ९० रुपये. अंड्याला तर तीनच रुपये. नुकसान मात्र कोट्यवधी रुपयांचे. दुपारी बारानंतरही ऑपरेशन सुरूच होते. काही कर्मचाऱ्यांना मळमळण्याचा त्रास होत होता. तैनात पथक त्यांच्यावर तत्काळ उपचार क



रीत होते.


Post a Comment

 
Top