शांतर्गत विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून पद्दुचेरीसमोर धावांचा डोंगर उभारण्यात आला आहे. या सामन्यात इंग्लडविरुद्ध कसोटी संघात स्थान न मिळालेल्या मुंबईकर पृथ्वी शॉने 142 चेंडूत नाबाद 227 धावाची खेळी केली. यात त्याने, 31 चौकार आणि 5 षटकार ठोकले. याशिवाय, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या सुर्यकुमार यादवनेही पृथ्वीसोबत 58 चेंडूत 133 धावा केल्या. यात त्याने 4 षटकार आणि 22 चौकार लगावले. या दोघांच्या खेळीमुळे मुंबईने पद्दुचेरीसमोर 50 षटकात 4 बाद 457 धावांचे आव्हान दिले आहे.
आज विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबई विरुद्ध पद्दुचेरी यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी पृथ्वी शॉकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले होते. पहिल्यांदाच नेतृत्त्व करताना पृथ्वी शॉने पद्दुचेरीच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. सामन्यात मुंबईसाठी पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेटसाठी 103 चेंडूत तब्बल 201 धावांची भागीदारी रचली. क्रिकेटच्या लिस्ट ए मध्ये यापूर्वी सहा जणांनी द्विशतके झळकावली आहेत. यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शिखर धवन, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांचा समावेश आहे. या यादीत आता पृथ्वी शॉचेही नाव समाविष्ट झाले आहे.
Post a Comment