आषाढी, कार्तिकीपाठोपाठ आता माघ वारीलाही पंढरपूर शहर व परिसरातील गावांमध्ये संचारबंदी लावण्यात येणार आहे. २२ व २३ फेब्रुवारीला मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असेल. मंदिरातील सर्व नित्योपचार, प्रथेनुसार धार्मिक कार्यक्रम होतील. एसटी वाहतूक नियंत्रित स्वरूपात सुरू राहील. पंढरीतील मठांची नियमित तपासणी होणार असून मुक्कामाची सोय नसेल, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत.
येत्या मंगळवारी (दि.२३) माघवारी आहे. प्रामुख्याने सोलापूर शहर व परिसरातील अनेक छोट्या-मोठ्या दिंड्या या वारी सोहळ्यात दरवर्षी सहभागी होतात. पण, यंदा कोरोनाचे सावट असल्याने दिंड्यांना पंढरपूर शहरामध्ये प्रवेश नाही. दरवर्षी माघवारीला राज्यभरातून २५० हून अधिक दिंड्यांसह, तीन ते चार लाख वारकरी पंढरीत दाखल होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी दिंड्यांना पंढरपूरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
Post a Comment