1

 जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंचे कर्करोग हे सर्वात मोठे दुसरे कारण आहे, त्यामुळे कर्करोगाविषयी जागरूकता होणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, २०१८ मध्ये जगभरातून १.८१ कोटी केसेस समोर आल्या आहेत तर ९६ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जर भारताचा विचार केला तर इथे जवळपास ११.५ लाख लोकांना कर्करोग होतो. गंभीर गोष्ट म्हणजे विकसित देशांच्या तुलनेत इथे कर्करोग रुग्णांचा मृत्युदर दुप्पट आहे. ग्लोबल ऑन्कोलॉजीच्या अहवालानुसार २०२० मध्ये भारतात प्रत्येक एक लाख पुरुषांमध्ये ९४ आणि एक लाख महिलांमध्ये प्रत्येकी १०३.६ महिलांना कर्करोग होतो. कर्करोगाने होणाऱ्या जवळजवळ एकतृतीयांश मृत्यूंसाठी ५ मुख्य कारणे जबाबदार आहेत. यामध्ये लठ्ठपणा, भाजीपाला आणि फळांचे आहारात सेवन न करणे, तंबाखू आणि मद्यपान करणे. कर्करोगाने होणाऱ्या एकूण मृत्यूंमध्ये २२ टक्के मृत्यू हे तंबाखूमुळे होतात. पुरुषांमध्ये फुप्फुसांचा कर्करोग तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग सर्वाधिक होतो.




Post a Comment

 
Top