आजच्या पॉझिटिव्ह स्टोरीमध्ये माहिती घेणार आहोत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात राहणाऱ्या सचिन तानाजी येवले आणि त्यांच्या पत्नी वर्षा सचिन येवले यांची. दोन्ही सुशिक्षित असून सचिनने गेली कित्येक वर्षे मल्टीनॅशनल कंपनीत काम केले आहे. परंतु, तो आता आपल्या पत्नीसोबत अडीच एकरात सेंद्रीय आणि नाविण्यपूर्ण शेती करतो आणि त्यातून ऊस, फळे आणि भाजीपालांचे उत्पादन घेतो. याबरोबरच ते सेंद्रिय गूळ, मसाला गूळ, गूळ साखर, लॉलीपॉप आणि कँडी आदी उत्पादनातून दरवर्षी 15 लाख रुपये कमवत आहे.
33 वर्षांच्या सचिनने 'अॅग्रीबिझिनेस मॅनेजमेंट' मध्ये पीजी डिप्लोमा केला असून त्याची पत्नी वर्षा हिने बीएससी अॅग्रीकल्चरमध्ये शिक्षण घेतले आहे. सचिन सांगतो की, "नोकरीच्या वेळेस मी हमेशा हा विचार करत होतो की, शिक्षणातून मी जे काही शिकलो आहे. त्याशिक्षाणाचा उपयोग इथे कुठेच करता येत नव्हता. मला शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काम करता येत नसून, त्यामुळे, मी 2013 ला नोकरी सोडून शेती करण्याचे ठरविले."
Post a Comment