0

 अलीकडेच अभिनेता अध्ययन सुमन यांच्याविषयीची एक खोटी बातमी समोर आली होती. यात अध्ययनने आत्महत्या केल्याचे म्हटले गेले होते. एका वृत्तवाहिनीने ही खोटी बातमी दाखवली होती. त्यानंतर अध्ययनचे वडील आणि अभिनेते शेखर सुमन यांनी ही निंदनीय घटना असल्याचे म्हटले होते. शेखर यांनी सांगितल्यानुसार, जेव्हा ही खोटी बातमी समोर आली तेव्हा अध्ययन दिल्लीत होता. या बातमीमुळे कुटुंबात खळबळ उडाली होती. अशा खोट्या बातमीसाठी वाहिनीने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, असे ते म्हणाले.

शेखर सुमन यांनी आपल्या जीवनात बरेच चढउतार पाहिले आहेत. त्यांच्या आयुष्यातला एक काळ असा होता, जेव्हा ते डिप्रेशनमध्ये गेले होतेशेखर सुमन यांनी गमावला आपला मोठा मुलगा

शेखर सुमन यांचा मोठा मुलगा आयुषला एंडोकार्डियल फायब्रोएलास्टोसिस नावाचा एक दुर्मिळ हृदयाचा आजार होता, ज्यामुळे त्याचे वयाच्या 11 व्या वर्षी निधन झाले. मुलगा गमावल्यानंतर शेखर नैराश्यात गेले होते. ते आणि त्यांची पत्नी अलका इतके नैराश्यात होते की त्यांना जगण्याची इच्छा नव्हती.

शेखर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते होते की, आयुष निघून गेल्यानंतर त्यांचे आयुष्य पुन्हा रुळावर यायला बरीच वर्षे लागली. 1988 मध्ये त्यांचा दुसरा मुलगा अध्ययनचा जन्म झाला. त्यांना 'देख भाई देख' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे शेखर यांना इंडस्ट्रीत ओळख मिळाली. शेखर यांचे काम व्यवस्थित सुरू झाल्यानंतर अलका यांनी त्यांच्या लहान मुलावर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली.

अलका यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही गेल्या 38 वर्षांपासून एकत्र आहोत. आम्ही आयुष्यात बरेच उतार-चढाव एकत्र पाहिले परंतु दोघांनी कधीही ए


कमेकांची साथ सोडली नाही. आम्ही दोघेही एकमेकांचे सर्वात मोठे सपोर्टर आहोत.


Post a Comment

 
Top