0

 इंस्टाग्रामने प्रायव्हेट डायरेक्ट मेसेज (DMs)बाबत कठोर भूमिका घेतली आहे. इन्स्टाग्रामने डायरेक्ट मेसेजमध्ये वारंवार अभद्र भाषेचा वापर करणाऱ्या युजर्सचे अकाउंट ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. जर वापरकर्त्यांने नियम मोडले तर त्याच्या खात्यातून मॅसेज पाठवण्याची सुविधा काही काळासाठी बंद केली जाईल असे कंपनीने सांगितले आहे.

जर एखाद्या यूजरने चुकीच्या भाषेचा वापर करत संदेश पाठवत राहिला तर आम्ही त्यांचे अकाउंट ब्लॉक करू असे इन्स्टाग्रामने सांगितले. तसेच केवळ असे अभद्र भाषेत मेसेज पाठवण्यासाठी तयार केलेले अकाउंट देखील ब्लॉक करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने जगभरातील असे पर्सनल अकाउंट्सना रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे.

फुटबॉलपटूशी झालेल्या गैरवर्तनामुळे उचलले पाऊल

ब्रिटनमध्ये फुटबॉलपटूसोबत झालेल्या ऑनलाईन गैरवर्तनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने यासंदर्भांत नवीन अपडेट जारी केले आहे. आम्हाला इन्स्टाग्रामवर अशाप्रकारचे गैरवर्तन नको असे कंपनीने म्हटले होते. लोक मॅसेज पाठवतांना अशा युजर्संना टॅग करतात ज्यांना ते पूर्णपणे ओळखतसुद्धा नाहीत. अशावेळेस ते टॅग न करण्याचा पर्याय निवडू शकतात. मात्र तरीही त्यांनी टॅग केले तर त्यांनाही ब्लॉक केले जाईल, असेही कंपनीने सांगितले.

गेल्या वर्षी जुलैमध्ये केली होती कारवाई

मागील वर्षी जुलै ते सप्टेंबर दरम्यान इन्स्टाग्राम वर अभद्र भाषेचा वापर असलेल्या 6.5 मिलियन (65 लाख) मेसेजवर कारवाई केली होती. हे सर्व डायरेक्ट पाठवलेले मेसेज होते. कंपनीचे म्हणणे आहे की, डायरेक्ट मॅसेजचा वापर हा एखाद्या युजरसाठी केला जातो. यामुळे द्वेष पसरण्याचा कोणताही धोका नाही.

ऑक्टोबर 2020 मध्ये जोडले डायरेक्ट मेसेज फीचर

कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 'इन्स्टाग्राम डायरेक्ट मेसेज'ला (DMs) फेसबुक मेसेंजर प्लॅटफॉर्मशी जोडले होते. या फीचरच्या मदतीने मेसेंजर अ‍ॅप वापरणारे युजर कोणत्याही अडचणीशिवाय आणि नवीन अ‍ॅप डाउनलोड न करता फेसबुक मित्रांशी बोलू शकतात. अशाचप्रकारे इन्स्टाग्राम डायरेक्ट मेसेजचे युजर देखील फेसबुक मेसेंजरद्वारे मेसेर पाठवू शकतात.



Post a Comment

 
Top