भारत आणि इंग्लंडदरम्यान 4 कसोटी सीरीजचा तिसरा सामना आज अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये सुरू आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 112 धावांवर ऑल आउट झाला. करिअरमधील दुसरा कसोटी सामना खेलणाऱ्या स्पिनर अक्षर पटेलने 6 विकेट घेतल्या. याशिवाय, रविचंद्रन अश्विनने 3 आणि इशांत शर्माने 1 विकेट घेतली. सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
इंग्लंडची खराब सुरुवात
इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लिश टीमच्या दोन विकेट 27 धावांवर पडल्या. 100वा कसोटी खेळणाऱ्या इशांत शर्माने इंग्लंडला पहिला झटका दिला. ओपनर डॉम सिबली 1 रन काढून इशांतच्या बॉलवर स्लिपमध्ये रोहित शर्माकडे झेलबाद झाला.
अक्षरने 6 विकेट घेतल्या
स्पिनर अक्षर पटेलने 6 विकेट घेऊन इंग्लंडला मोठा धक्का दिला. पटेलने 7 व्या ओव्हरमध्ये इंग्लिश टीमची दुसरी विकेट घेतली. जॉनी बेयरस्टोला LBW केले. यानंतर अक्षरने जॅक क्राउलीला 53 रनांवर LBW केले. क्राउलीने करिअरमधील चौथे अर्धशतक लगावले. यानंतर पटेलने बेन स्टोक्स (6) लाही LBW केले. यानंतर अक्षरने जोफ्रा आर्चर आणि शेवटी स्टुअर्ट ब्रॉडला आउट केले.
अश्विनने 3 विकेट घेतल्या
स्पिनर रविचंद्रन अश्विनने 3 विकेट घेतल्या. अश्विनने इंग्लिश टीमला दुसरा झटका देताना कर्णधार जो रूटला 17 रनांवर LBW केले. यानंतर अश्विनने ओली पोप (1 रन) आणि जॅक लीचला आउट केले.
Post a Comment