0

 तीन भारतीय चित्रपटांना वल्चरने बनवलेल्या बेस्ट मुव्ही एंडिंगच्या यादीत स्थान मिळाले आहे. हा निश्चितच भारतीय सिनेमासाठी अभिमानाचा क्षण आहे. या यादीत सामील झालेल्या आमिर खानच्या 'लगान' आणि सत्यजीत रे यांच्या 'अपूर संसार' या चित्रपटांचा शेवट सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. याशिवाय मीरा नायर यांच्या 'सलाम बॉम्बे' या चित्रपटाचाही शेवट सर्वोेत्कृष्ट ठरला आहे. खरं तर 'सलाम बॉम्बे' या चित्रपटाला यादीत स्थान मिळालेले नाही, मात्र याचा उल्लेख 15 अशा चित्रपटांमध्ये केला गेला, ज्यांचा शेवट सर्वोत्कृष्ट राहिला, मात्र त्यांना यादीत स्थान मिळवता आले नाही.

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लगान'ला या यादीत 90 वे स्थान देण्यात आले आहे. तर सत्यजित रे यांच्या 1951 च्या ‘अपूर संसार’ या चित्रपटाला 41 वा क्रमांक मिळाला. ही यादी तयार करणा-या टीमने प्रत्येकाला स्थान मिळावे म्हणून प्रत्येक दिग्दर्शकाचा चित्रपट पाहिला. यादी जारी करताना वल्चरने लिहिले - या चित्रपटांची खासियत काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही चित्रपटाचा शेवट पाहिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाचे शीर्षक त्याच्या शेवटासोबत जुळणे आवश्यक होते. त्यानेच वल्चरच्या टीमला चित्रपटाशी कनेक्ट केले. वल्चरने आपल्या वेबसाइटवर या सर्व 101 चित्रपटांचे एंडिग सीनदेखील शेअर केले आहेत.Post a Comment

 
Top