कंगना रनोट आणि आर. माधवन स्टारर 'तनु वेड्स मनु' या चित्रपटाच्या रिलीजला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2011 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे माझ्या करिअरची दिशा बदलण्यास मदत झाली आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवीनंतर कॉमेडी करणारी मी एकमेव अभिनेत्री ठरली, असे मत कंगनाने व्यक्त केले आहे.
विचित्र भूमिकांमध्ये अडकली होती
कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "मी विक्षिप्त आणि विचित्र भूमिकांमध्ये अडकले होते. या चित्रपटाने माझ्या कारकिर्दीची दिशा बदलली. या चित्रपटाने मला कॉमेडीसोबतच मुख्य प्रवाहातल्या सिनेमांत एन्ट्री दिली. क्वीन आणि दत्तो यांच्यासह मी माझी कॉमिक टायमिंग परफेक्ट केली आणि दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीनंतर कॉमेडी करणारी एकमेव अभिनेत्री ठरली," असे कंगनाने म्हटले आहे.
Post a Comment