टीम इंडियाने इंग्लंडविरोधात डे-नाइट टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट कामगिरी केली. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. टॉस जिंकून पहिल्या इनिंगमध्ये 112 धावा केल्या होत्या. यानंतर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 145 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लिश टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 81 धावांवर ऑल आउट झाली. यानंतर टीम इंडियासमोर विजयासाठी 49 धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य भारताने एकही विकेट न गमवता गाठले. सलामीवीर रोहित शर्माने 25 आणि शूभमन गिलने 15 धावा केल्या. सामन्याचा स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा...
दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडसाठी बेन स्टोक्सने सर्वाधिक 25 आणि कर्णधार जो रूटने 19 धावा केल्या. टीम इंडियाचा स्पिनर अक्षर पटेलने 5 आणि रविचंद्रन अश्विनने 4 विकेट घेतल्या. एक विकेट वॉशिंग्टन सुंदरला मिळाली.
इंग्लंडने पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्या
दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडची अतिशय खराब सुरुवात झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये स्पिनर अक्षर पटेलने जॅक क्राउली आणि जॉनी बेयरस्टोला क्लीन बोल्ड केले. यानंतर अक्षरने टीमला 19 धावांवर तिसरा झटका दिला. डॉम सिबनी 7 रन काढून विकेटकीपर ऋषभ पंतकडे झेलबाद
झाला.
Post a Comment