0

ऑस्ट्रेलियाने फेसबुक आणि गूगलला मोठा धक्का दिला आहे. आता ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक आणि गूगलला बातम्यांसाठी पैसे द्यावे लागतील.  

   कॅनबेराऑस्ट्रेलियाने फेसबुक आणि गूगलला मोठा धक्का दिला आहे. आता ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक आणि गूगलला बातम्यांसाठी पैसे द्यावे लागतील. कोरोना विषाणूनंतर तेथील मीडिया उद्योग तोट्यात जात असताना ऑस्ट्रेलिया सरकारने हे पाऊल उचलले. ऑस्ट्रेलियन सरकारने शुक्रवारी या प्रकरणाचा खुलासा केला. या देयकासंदर्भात शासनाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत, जी लवकरच संसदेत पास होण्यासाठी सादर केली जातील.

ऑस्ट्रेलियन सरकारच्या म्हणण्यानुसार आता गूगल आणि फेसबुकला वृत्तासाठी पैसे द्यावे लागतील. बातमीच्या आशयासाठी सरकार शुल्क आकारत आहे. गूगल आणि फेसबुकला मीडिया कंपन्यांशी बोलण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. बातमी कंटेचसाठी शुल्क निर्धारित करण्यात येणार आहे. आणि याचे पालन करावे लागलसरकारने आचारसंहिता (MANDATORY CODE) अनिवार्य केली असून याचा मसुदा जाहीर केला. ज्यामुळे डिजिटल कंपन्यांना व्यावसायिक मीडिया कंपन्यांकडून घेतल्या गेलेल्या बातम्यांकरिता पैसे द्यावे लागतील.

ऑस्ट्रेलिया सरकारमधील कोषाध्यक्ष जोश फ्रायडेनबर्ग म्हणाले की, 'आम्ही गूगल आणि फेसबुकशी १८ महिन्यांपासून बातम्यांच्या पैशाबद्दल बोललो पण दोघेही या प्रकरणात एकत्र येऊ शकले नाहीत'. तसेच या आठवड्यात संसदेत गूगल आणि फेसबुकवरील बातम्यांकरिता पैशे देण्याबाबतचा कायदा  सादर करण्यात येईल. यानंतर या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला कोट्यवधी रुपये मोजावे लागतील. तथापि, हा दंड फक्त ऑस्ट्रेलियाशी संबंधित बातमी सामग्रीसाठी असेल. आमचे लक्ष जगातील सर्वात प्रसिद्ध डिजिटल प्लॅटफॉर्म गूगल आणि फेसबुकवर आहे.

 

 


Post a Comment

 
Top