0

आईच्या निधनानंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली...


महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल ( दि. 1 ऑगस्ट) निधन झालं. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या 74 वर्षांच्या होत्या. जवळपास गेल्या दीड महिन्यापासून पासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होतेपण अखेर उपचारादरम्यानच शारदाताईंनी अखेरचा श्वास घेतला.

एकीकडे आईची काळजी घेणे आणि दुसरीकडे करोनाची लढाई लढणे अशी दुहेरी कसरत गेल्या महिनाभरापासून टोपे यांची सुरू होती. पण, आता आईच्या निधनानंतर त्यांनी आपल्या भावनांना ट्विटरद्वारे मोकळी वाट करून दिली आहे. “ती अजातशत्रु होतीएका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही….सर्वांना प्रेम दिलेमाझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती….दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील”, असं भावनिक ट्विट टोपे यांनी केलं आहे. याशिवाय, जालन्यातील अंबड तालुक्यात असणाऱ्या मूळगावीच आज (2 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजता शारदाताईंवर अंत्यसंस्कार होतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. करोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 


Post a comment

 
Top