0

नेपाळच्या सैन्याला आता पाकिस्तानच्या लष्कराप्रमाणे कॉर्पोरेट लष्कर बनण्याचे वेध लागले आहेत. देशात उद्योग धंदे सुरू करून नेपाळी सैन्याला आपली आर्थिक ताकद वाढवायची आहे.

 
संग्रहित छायाचित्र
काठमांडू: चीन आणि पाकिस्तानसोबत मैत्री संबंध घट्ट करणाऱ्या नेपाळचे सैन्य पाकिस्तानी लष्कराच्या मार्गावरून चालला आहे. पाकिस्तानच्या सैन्याप्रमाणे आता नेपाळच्या लष्करालाही उद्योग-व्यवसाय सुरू करायचे आहे. मोठ्या प्रमाणावर नफा होईल अशा क्षेत्रातील उद्योगात नेपाळच्या लष्कराला गुंतवणूक करायची आहे. नेपाळ लष्कराच्या या 'कॉर्पोरेट' धोरणाला देशात विरोध सुरू झाला आहे.
'काठमांडू पोस्ट'च्या वृत्तानुसार, 'द नॅशनल डिफेंस फोर्स'ने एका विधेयकाचा मसुदा सादर केला आहे. या मसुद्यानुसार, नेपाळ आर्मी कायद्याला बदलता येणार आहे. नेपाळच्या लष्कराने आपल्या कल्याणकारी निधीला वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायात 'प्रमोटर' म्हणून गुंतवणूक करण्यास कायदेशीर सल्ला मागितला आहे. यासाठी नेपाळी लष्करी अधिकारी मागील वर्षापासून प्रयत्न करत आहेत.

नेपाळ लष्कराचे कायदेशीर प्रभारी रंत प्रकाश थापा यांनी सांगितले की, त्यांच्या प्रस्तावित विधेयकाला सरकारची मंजुरी मिळेल. नेपाळच्या प्रस्तावित कायद्यानुसार, लष्कराला उद्योग, कंपनी आणि जलविद्युत प्रकल्पासारख्या पायाभूत प्रकल्पात गुंतवणूक करण्यास निर्बंध आहेत. नेपाळी लष्कराला राष्ट्रीय सुरक्षा, गुप्त माहिती संकलित करणे या कामांपेक्षा उद्योगांमध्ये अधिक रस दिसत असल्याचे संरक्षण तज्ञांनी सांगितले.

Post a comment

 
Top