0

कोरोनाच्या पहिल्या प्रकरणांवरुन जगभरातून टीक होत असलेल्या जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) परत एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. नवीन वादाचे कारण आहे कोरोना टाइमलाइन. डब्ल्यूएचओने आधी म्हटले होते की, 31 डिसेंबर 2019 ला चीनने कोरोनाच्या पहिल्या प्रकरणांची माहिती दिली होती. पण, आता डब्ल्यूएचओच्या वेबसाइटवरील कोरोनाच्या अपडेटेड टाइमलाइनमुळे वाद सुरू झाला आहे.

डब्ल्यूएचओचा यू-टर्न

वर्तमान टाइमलाइननुसार, आता डब्ल्यूएचओचे म्हणने आहे की, चीनने आम्हाला पहिल्या प्रकरणाची माहिती दिली नाही. तर, चीनमधील आमच्या कंट्री ऑफिसला मीडियाकडून वुहानच्या पहिल्या प्रकरणाची माहिती मिळाली होती. मीडियामध्ये वुहान नगरपालिका आरोग्य आयोगाच्या हवाल्याने आलेल्या माहितीत ‘वायरल नियोनिया’बाबत कळाले होते. टाइमलाइनमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे  की, चीनने अधिकृतरित्या 31 डिसेंबर 2019 ला डब्ल्यूएचओला माहिती दिली नाही.

डब्ल्यूएचओने 9 एप्रिलला माहिती दिली

महामारीबाबत डब्ल्यूएचओने सुरुवातीची टाइमलाइन 9 एप्रिलला जारी केली होती. त्यात फक्त इतकेच म्हटले होते की, चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहराच्या आरोग्य आयोगा ने 31 डिसेंबरला निमोनियाच्या प्रकरणांची माहिती दिली.

31 डिसेंबरला व्हायरल निमोनियाची माहिती दिली

डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रॉस ऐडनॉम ग्रेबयेसस यांनी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सांगितले की, चीनमधून पहिली रिपोर्ट 20 एप्रिलला आली होती. त्यांनी म्हटले की, यात स्पष्टपणे सांगितले नव्हते की, रिपोर्ट चीनच्या अधिकाऱ्यांनी पाठवली, का इतर स्त्रोतातून आली. पण डब्ल्यूएचओने या आठवड्यात एक नवीन क्रोनोलॉजी जारी केली आहे, यात या घटनांबद्दल विस्ताराने सांगितले आहे. यात सांगण्यात आले आहे की, चीनमधील डब्लूएचओच्या कार्यालयाने 31 डिसेंबरला व्हायरल निमोनियाची माहिती दिली होती.

Post a comment

 
Top